मुख्यपान › About
About

dbascale म्हणजे कोण?

भारतीय व्यवसायांसाठी, मराठीत चालणारी AI products बनवणारं एक छोटं studio. नाशिकमधून — Udyam-नोंदणीकृत, खरं आणि जबाबदार.

आम्ही काय करतो

बहुतेक business software इंग्रजीत असतं आणि ते वापरणारा माणूस मराठीत विचार करतो. मधलं हे अंतर रोज कुणाचा तरी वेळ, ग्राहक किंवा पैसा खातं. dbascale ती दरी बुजवायचा प्रयत्न करतं — आम्ही अशी AI products बनवतो जी माणसाच्या स्वतःच्या भाषेत बोलतात.

आम्ही agency नाही. प्रत्येक ग्राहकासाठी वेगळं software बनवून देत नाही. आम्ही मोजकीच products बनवतो, ती नीट चालवतो, आणि त्यांची किंमत जाहीर ठेवतो.

कायदेशीर नाव
DBA SCALE
प्रकार
Proprietorship · MSME
Udyam नोंदणी
UDYAM-MH-23-0423848
ठिकाण
नाशिक, महाराष्ट्र, भारत
Meta Business
Verified ✓
संपर्क
support@dbascale.com

आमची products

  • 💬boliqAI — WhatsApp वर तुमच्या ग्राहकांशी बोलणारा AI सेल्स एजंट. चौकशीला २४×७ उत्तर, lead ची नोंद, आणि तयार ग्राहक मिळताच तुम्हाला alert. उघडा →
  • 🏢SocietyAI — गृहनिर्माण society चं संपूर्ण management: सभासद, वॉचमन, हिशोब, तक्रारी व सूचना. उघडा →

आम्ही कसं काम करतो

१. मराठी ही डिफॉल्ट, नंतरची जोड नाही

आमची products आधी मराठीत बनतात, मग इतर भाषांत. त्यामुळे भाषांतर केल्यासारखी वाटत नाहीत. (English आणि हिंदी दोन्ही चालतात.)

२. किंमत जाहीर

दर website वर लिहिलेला असतो. “किंमतीसाठी संपर्क करा” असं आम्ही म्हणत नाही — त्याने फक्त वेळ जातो.

३. Setup आम्ही करून देतो

तांत्रिक भाग तुमच्यावर टाकत नाही. screen-share वर साधारण ५ मिनिटांत सुरू करून देतो.

आणि एक प्रामाणिक गोष्ट

आम्ही नवीन आणि लहान आहोत. मोठ्या कंपनीसारखी वर्षानुवर्षांची यादी आमच्याकडे नाही. त्याचा फायदा असा की तुमचा फोन थेट products बनवणाऱ्या माणसाकडे जातो — support ticket च्या रांगेत नाही. अडचण आली तर उत्तर त्याच दिवशी मिळतं.

बोलायचं आहे?

कोणतं product तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवायला मदत हवी असेल, तर एक email पुरे.

support@dbascale.com Products पाहा